Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लता मंगेशकर यांच्या निधनानं संपलं..!!

भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लता मंगेशकर यांच्या निधनानं संपलं..!! मुंबई (प्रतिनिधी) :- गानकोकीळा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.  केंद्र सरकारकडून २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्य