Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

ब्रेकिंग न्यूज: नवी मुंबई रबाळे एमआयडीसी भूषण हॉटेल जवळील मशिदीच्या बकारीला भीषण आग लागली :

ब्रेकिंग न्यूज: नवी मुंबई रबाळे एमआयडीसी भूषण हॉटेल जवळील मशिदीच्या बकारीला भीषण आग लागली : रबाळे (प्रतिनिधी) :- नवी मुंबई रबाळे एमआयडीसी भूषण हॉटेल जवळील मशिदीच्या बकारीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या यावेळी नागरिकांनी देखील एकमेकास सहकार्य करुण मदतकार्य करत होते.  मात्र या आगीत मशिदीच्या आजूबाजूला असणाऱ्या काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्याला सुरुवात केली.  तसेच, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाला, ही आग बुधवारी १६ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास लागली असल्याचे समजले आहे या आगी वर रात्री बारा साडेबाराच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात आले आता नेमकी ही आग कशामुळे लागली याचे अद्यापही कारण समजू शकले नाही.

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात:

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात: ● अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सवाला खासदार कुमार केतकर यांची हजेरी ● आगरी कोळी महोत्सव 2022 नामदेव रामा भगत उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. माजी सिडको संचालक संस्थापक अध्यक्ष अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट नेरुळ (प्रतिनिधि) : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आणि नगरसेवक नामदेव भगत यांच्या सहकार्याने नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर २३ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई ऑयडॉल गीत गायन स्पर्धा, नवी मुंबई सुंदरी वेशभूषा स्पर्धा, लावणी स्पर्धा, आंतरशालेय नृत्यस्पर्धा, विविध गुणदर्शन, कोळी नृत्य, लावणी नृत्य, एकपात्री विनोदी नाट्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवाची रंगत वाढविणार आहेत. विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, सुक्या मासळीचा बाजार, भव्य फनफेअर हे या महोत्सव