Skip to main content

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात:

न्यूज अपडेट: नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन थाटामाटात:

● अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सवाला खासदार कुमार केतकर यांची हजेरी

● आगरी कोळी महोत्सव 2022 नामदेव रामा भगत

उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. माजी सिडको संचालक संस्थापक अध्यक्ष अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट

नेरुळ (प्रतिनिधि) :

अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आणि नगरसेवक नामदेव भगत यांच्या सहकार्याने नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानावर २३ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान भव्य आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई ऑयडॉल गीत गायन स्पर्धा, नवी मुंबई सुंदरी वेशभूषा स्पर्धा, लावणी स्पर्धा, आंतरशालेय नृत्यस्पर्धा, विविध गुणदर्शन, कोळी नृत्य, लावणी नृत्य, एकपात्री विनोदी नाट्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवाची रंगत वाढविणार आहेत. विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचा आकर्षक देखावा, संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, सुक्या मासळीचा बाजार, भव्य फनफेअर हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आगरी कोळी समाजातील लोकांचा पुरस्काराने देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

येथील ग्रामसंस्कृती, लोककला व लोकपरंपरेचे जतन व्हावे, नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलावंतांचा गुणगौरव व्हावा, ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यामध्ये वैचारिक आदान-प्रदान व्हावे, सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत व्हावी, हाच उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

यावेळी मोठ्या संख्येने नेरूळकरांनी उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घेतला. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, त्याचबरोबर आगरी- कोळी पध्दतीचे खास जेवण दिल्ली कुलपी, पाणीपुरी, चायनीज आदि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. महोत्सवात येणाऱ्यांसाठी साजश्रुंगार आणि घरगुती सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे, तसेच तरूणपिढीसह लहान मुलांना फुल- टू धम्माल करता यावी, यासाठी विविध प्रकारचे पाळणे, जादूची गुहा उभारण्यात आली असून यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तर या महोत्सवामुळे आगरी - कोळी समाजाच्या परंपरा येथे राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकानाही कळाव्यात हा हेतू असून त्यानिमित्ताने समाजाची संस्कृती जतन केली जात आहे. यावेळी अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट आयोजित तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सवाला खासदार कुमार केतकर तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माजी सिडको संचालक नामदेव भगत, नगरसेविका इंदूमती भगत, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धीरज आहूजा सौ. उमा आहूजा आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे