Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

राष्ट्रीय भीमशक्ति संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांची नियुक्ती:

राष्ट्रीय भीमशक्ति संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांची नियुक्ती: नवी मुंबई (प्रतिनिधी) :   नवी मुंबई येथे गेली तीस वर्षांपासून पत्रकारीता करत सामाजिक कार्यात पक्ष विरहित आग्रसर असलेले पत्रकार मोहन वाघमारे यांनी आपल्या गावी सातारा वरुड येथे बुद्ध विहारासाठी भगवान बुद्धाची मुर्ती दान देऊन लोकांची वाहव्वा मिळवली, १९९२ साली सातारा, सांगली व नवी मुंबईत प्रसिद्ध सा. आजचा सातारा सांगली वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत आहेत.  तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैनिक नवाकाळ मधे पहिले नवी मुंबई चे प्रतिनिधी म्हणून बातमी दाराचे काम करताना अनेक लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.  महाराष्ट्रातील एक मार्गदर्शक दिवंगत निलकंठ खाडिलकर यांचा प्रॅक्टिकल सोशलिझम या संघटनेतर्फे गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गिरणी मालका विरोधात आंदोलनात भाग घेतला होता.  कोपर खैराणे नवी मुंबईतील राजपाल हॉस्पिटल मधे गेली २० वर्षांपासून छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले छ. शाहू राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती, राष्ट्र पुरुष जयंती उत्सव समिती व्दारे त्यांचे अध्यक्ष ते ख

राज्यात पुन्हा एकदा कोरोना ने डोकं वर काढलं..!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोना ने डोकं वर काढलं. गेल्या २४ तासात राज्यात ४ हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलीय. धक्कादायक म्हणजे मुंबईत सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल ९९ टक्के रुग्णांमध्ये घातक आणि अत्यंत वेगानं पसरणारा ओमायक्रॉन व्हेरियंट आढळून आला आहे.  रुग्णांमध्ये घातक ओमायक्रॉन ९९ टक्के - मुंबईत सापडलेल्या २०२ रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तब्बल २०१ रुग्णांमध्ये ओमायक्रॉन आणि एका रुग्णात डेल्टा व्हेरियंट सापडलाय. यातील ४४ टक्के रुग्ण हे २१ ते ४० वयोगटातील आहेत. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्येही ओमायक्रॉनची प्रकरणं आढळून आल्याची माहिती आहे. ठाण्यातही ओमायक्रॉनच्या BA.5 या सबव्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आलेत.  मुंबईचा धोका वाढत असताना सरकारही सावध झालंय. "हर घर दस्तक योजना" राबवून लसीकरण वाढवण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, केंद्र सरकारनं सर्व राज्यांना ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटबाबत सावधगिरीचा इशार