Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

नवी मुंबई राष्ट्रवादी युवकचे निषेध आंदोलन :

नवी  मुंबई राष्ट्रवादी युवकचे निषेध आंदोलन : नवी मुंबई ( प्रतिनिधी ) : वेदांतागृप व फोक्सकॉन कंपनी च्या माध्यमातुन  सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रूपयाची गुंतवणूक होणार होती त्या संदर्भात जुलै २०२२ पर्यंत चर्चा सुरू होती. परंतु हीच गुंतवणुक गुजरात राज्यात करण्याचा निर्णय भाजप-शिंदे सरकारने आपल्या दुटप्पी कारभाराने घेण्यास भाग पाडले आहे. सदर प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १ ते १.५९ लाख  तरुणांना मिळणारा रोजगार गेला आहे. तसेच  महाराष्ट्र राज्याला आर्थिक दृष्ट्या मजबुत होण्यासही मदत झाली असती. सदर प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी फोक्सकॉन -वेदांत गृप यांना निमंत्रीत करावे. तसेच अशा असंवेदनशील सरकार च्या निष्काळजीपणामुळे ईथुन पुढे महाराष्ट्रविरोधी कृती घडल्यास राज्यातील युवक तीव्र आंदोलन करून सरकार ला बेजार करू अशा आशयाचे निवेदन विभागीय कोकण आयुक्त बेलापूर येथे देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री प्रशांत पाटील साहेब, प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री नामदेव भगत साहेब, नवी मुंबई कार्याध्यक्ष श्री जी एस पाटील साहेब, प्रदेश युवक सचिव श्री रेहमान सय्यद, श्री किशोर (अ

ग्रामपंचायत निवडणूका महासंग्राम नक्की कोण कोणासोबत..??

ग्रामपंचायत निवडणूका महासंग्राम नक्की कोण कोणासोबत..?? नवी मुंबई : महाराष्ट्रात रविवारी झालेल्या 547 ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर आज निकालाचे आकडे समोर येत आहेत . 608 ग्रामपंचायतीमधील काही ठिकाणचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपची सरसी असल्याचे दिसत आहे . ग्रामपंचायत निवडणूक राजकीय चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते . - 608 ग्रामपंचायतींपैकी 495 ठिकाणचे निकाल समोर आले आहेत . त्यामध्ये भाजप - 143 , राष्ट्रवादी - 127 , काँग्रेस 59 , शिंदे गट -41 , शिवसेना -37 आणि इतर - 88 अशी आकडेवारी समोर आली आहे . भाजप + शिंदे गट- 184 तर महाविकास आघाडीला 223 ठिकाणी विजय मिळाला आहे. भाजपने सर्वाधिक 143 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे . दरम्यान , अद्यापही काही ग्रामपंचायतींचा निकाल येणे बाकी आहे . विजयी उमेदवारांचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे . माहिती अपडेट होत आहे . 

नवी मुंबईची "शान" आ. गणेश नाईक:

नवी मुंबईची "शान" आ. गणेश नाईक: नवी मुंबई :- देशातील पहिली ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारुपाला आलेले शहर म्हणजे नवी मुंबई. मुंबई वसवण्यात परकीयांचा बराच वाटा होता. मात्र, नवी मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजनबद्ध शहर हे भारतीय व्यक्तींच्या दूरदृष्टीतून साकारलेले आहे. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासात आ. गणेश नाईक यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या नेतृत्वात गेली तीन दशके नवी मुंबईत विकासाची पताका फडकावली जात आहे. गणेश नाईक यांच्या कार्यातून नवी मुंबईचा चौफेर विकास साकारला आहे. गणेश नाईक यांची ओळख शून्यातून जग निर्माण करण्याची किमया साधणारे नवी मुंबईचे शिल्पकार अशी असून त्यांचे जीवनचरित्र तमाम जनतेला स्फूर्ती देणारे आहे. गणेश नाईक यांचा जन्म दि. १५ सप्टेंबर, १९५० रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. इतरांच्या मदतीला धावून जाणार्‍या आणि मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीत सर्वांमध्ये लोकप्रिय झाले. जिद्द, कामाची चिकाटी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा यामुळे त्यांनी शून्यातून गरुडझेप घेतली. बोनकोडे, कोपरखैरणे या छोट्यांशा गावातून आमद

घणसोली येथे राहणारे गणेश मूर्तिकार सोपान खाडे यांचा मुंबईचा राजा चिंतामणी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सन्मान:

घणसोली येथे राहणारे गणेश मूर्तिकार सोपान खाडे यांचा मुंबईचा राजा चिंतामणी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सन्मान: नवी मुंबई (प्रतिनिधी) : माथेरानच्या डोंगरात रेल्वे मोटारमन राजाराम खडे यांना दगडात गणपती दिसला आणि त्या ५४ फुटाच्या दगडात निसर्ग राजा गणपती साकारला. त्या निसर्ग राजा गणपतीची रंगसंगती आणि ठेवणं साकारणारे गणेश मूर्तिकार सोपान खाडे यांचा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या चिंतामणी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. माथेरानच्या डोंगरात निसर्गराजा कड्यावरचा गणपती असून त्या गणेशची निर्मिती १४ वर्ष मेहनत घेवून दगडात मूर्ती साकारण्याचे काम राजाराम खाडे यांनी तर त्या दगडातील मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी आखणी तसेच रंगसंगतीचे काम मूर्तिकार सजावट सोपान खाडे यांनी केले.  नवी मुंबई येथील घणसोली येथील कला महाविद्यालयात कला शिक्षक राजेश आहिरे व संजय पेढे यांच्याकडून शिक्षण घेतलेले सोपान खाडे हे गणेशोत्सवामध्ये मुंबईचे राजाचे अर्थात लालबाग येथील चिंतामणी मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहचले होते. कड्यावराच्या निसर्गराजा गणपतीची माहिती सोशल मीडियावर सतत येत असल्याने मुंबईचा र

न्यायासाठी पोलिस पत्नीचा सरकार व पोलिस प्रशासना विरोधात आजाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा:

न्यायासाठी पोलिस पत्नीचा सरकार व पोलिस प्रशासना विरोधात आजाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा: नवी मुंबई (प्रतिनिधी) :  नवी मुंबई उलवे येथील पोलिस शिपाई हनुमंत डवरे यांना एका गाडीने उडवले त्या अपघातात त्यांना अपंगत्वास सामोरे जावे लागत आहे तसेच आज त्यांच्या कुटुंबालाही मानसिक तान तणावातून जावे लागत आहे शेतकरी गरीब आई वडिलांना मुलाला अश्या अवस्थेत बघणे असहाय्य झाले आहे. यासाठी आज त्यांचे कुटुंब त्यांची पत्नी आमरण उपोषण करणार आहे. पीडित महिला या उलवे येथील रहिवासी असून पती पोलीस शिपाई हणमंत शंकर डवरे हे दि . 12 फेब्रुवारी 2022 रोजी टि. एस . चाणक्य , पाम बीच रोड सिग्नल वर कार्यातंर्गत कार्यरत असताना संदर्भ क्रमांक एक मध्ये नमूद दोषी इनोवा क्रिस्टा गाडी नंबर एम एच 43 बिई 9789 ह्या गाडीचे मालक हे स्वतः दारूच्या नशेत गाडी चालवत माझे पती पोलीस कर्तव्य बजावत असताना रात्री 1:30 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सुसाट गाडी चालवणारे गाडी मालक तथा त्यांचे ड्रायव्हर यांनी माझे पती व पतीचे अंगावर चार चाकी गाडी काढून माझे पती जिवंत मारण्याचा प्रयत्न केला . शिवाय अपघात घडल्यावर पेशंट तथा जखमीस घटनास्थळी सोडून,

शुभ्रा प्रकल्पाचे योगदान: संस्थापिका भाग्यश्री वर्तक:

शुभ्रा प्रकल्पाचे योगदान: संस्थापिका भाग्यश्री वर्तक: मुंबई (प्रतिनिधी) :- स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.सगळीकडे आजादी का अमृतमहोत्सव म्हणून वेगवेगळे समारंभ साजरे होत आहेत. दिनांक 23 ऑगस्ट रोजी रोचिराम टी. थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग Handicapped या शाळेतर्फे "शीघ्र निदान व उपचार केंद्र" या उपक्रमांतर्गत, अपनालय संस्था व शताब्दी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मानखुर्द मंडाला येथे जन जागृतीसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये रोचिराम शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. पूनमताई सावंत व शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टर वैशाली शहा यांनी कर्णबधिरत्वासंबंधित माहिती दिली. या कार्यक्रमाला वस्तीमधील पन्नास लाभार्थी उपस्थित होते.तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी त्याच वस्तीमध्ये स्क्रीनिंग साठी शून्य ते तीन वयोगटातील मुलांना बोलावून त्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यासाठी एकूण 45 लहान मुले उपस्थित होती व त्यांचे बेसिक स्क्रीनिंग करण्यात आले. वरील उपक्रमासाठी वस्तीमधून खूपच छान प्रतिसाद मिळाला. शाळेतील ऑडिओलॉजिस्ट माधवी, अश्विनी, शिक्षिका कविता,वर्षा,सुनीता तसेच सायकॉलॉजिस्ट सुप्रिया, सोशल वर्कर नम्