शुभ्रा प्रकल्पाचे योगदान: संस्थापिका भाग्यश्री वर्तक:
मुंबई (प्रतिनिधी) :-
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.सगळीकडे आजादी का अमृतमहोत्सव म्हणून वेगवेगळे समारंभ साजरे होत आहेत. दिनांक 23 ऑगस्ट रोजी रोचिराम टी. थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग Handicapped या शाळेतर्फे "शीघ्र निदान व उपचार केंद्र" या उपक्रमांतर्गत, अपनालय संस्था व शताब्दी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मानखुर्द मंडाला येथे जन जागृतीसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये रोचिराम शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. पूनमताई सावंत व शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टर वैशाली शहा यांनी कर्णबधिरत्वासंबंधित माहिती दिली. या कार्यक्रमाला वस्तीमधील पन्नास लाभार्थी उपस्थित होते.तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी त्याच वस्तीमध्ये स्क्रीनिंग साठी शून्य ते तीन वयोगटातील मुलांना बोलावून त्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यासाठी एकूण 45 लहान मुले उपस्थित होती व त्यांचे बेसिक स्क्रीनिंग करण्यात आले.
वरील उपक्रमासाठी वस्तीमधून खूपच छान प्रतिसाद मिळाला. शाळेतील ऑडिओलॉजिस्ट माधवी, अश्विनी, शिक्षिका कविता,वर्षा,सुनीता तसेच सायकॉलॉजिस्ट सुप्रिया, सोशल वर्कर नम्रता यांनी खूप मेहनत घेतली. त्याचप्रमाणे अपनालय संस्थेचे वॉलेंटियर्स यांच्या मदतीमुळे व मेहनतीमुळे इतक्या लोकांचा प्रतिसाद मिळू शकला.अपनालय व शताब्दी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प शंभर टक्के यशस्वी झाला.
शुभ्रा प्रकल्पाच्या संस्थापिका श्रीमती भाग्यश्री वर्तक म्हणाल्या, की आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून ही 0 ते 3 या वयोगटातील दिव्यांग बालके शोधण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. जेणेकरून अशा छोट्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात लवकरात लवकर आणता येईल व त्यांचे उत्तम भविष्य घडवता येईल. अशा कार्यशाळा गरीब वस्त्यांमध्ये व काही चांगल्या भागांमध्ये आयोजित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.