Skip to main content

न्यायासाठी पोलिस पत्नीचा सरकार व पोलिस प्रशासना विरोधात आजाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा:

न्यायासाठी पोलिस पत्नीचा सरकार व पोलिस प्रशासना विरोधात आजाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा:

नवी मुंबई (प्रतिनिधी) : 

नवी मुंबई उलवे येथील पोलिस शिपाई हनुमंत डवरे यांना एका गाडीने उडवले त्या अपघातात त्यांना अपंगत्वास सामोरे जावे लागत आहे तसेच आज त्यांच्या कुटुंबालाही मानसिक तान तणावातून जावे लागत आहे शेतकरी गरीब आई वडिलांना मुलाला अश्या अवस्थेत बघणे असहाय्य झाले आहे. यासाठी आज त्यांचे कुटुंब त्यांची पत्नी आमरण उपोषण करणार आहे.

पीडित महिला या उलवे येथील रहिवासी असून पती पोलीस शिपाई हणमंत शंकर डवरे हे दि . 12 फेब्रुवारी 2022 रोजी टि. एस . चाणक्य , पाम बीच रोड सिग्नल वर कार्यातंर्गत कार्यरत असताना संदर्भ क्रमांक एक मध्ये नमूद दोषी इनोवा क्रिस्टा गाडी नंबर एम एच 43 बिई 9789 ह्या गाडीचे मालक हे स्वतः दारूच्या नशेत गाडी चालवत माझे पती पोलीस कर्तव्य बजावत असताना रात्री 1:30 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सुसाट गाडी चालवणारे गाडी मालक तथा त्यांचे ड्रायव्हर यांनी माझे पती व पतीचे अंगावर चार चाकी गाडी काढून माझे पती जिवंत मारण्याचा प्रयत्न केला . शिवाय अपघात घडल्यावर पेशंट तथा जखमीस घटनास्थळी सोडून, जखमीस हॉस्पिटलमध्ये न नेता , दोषी गाडी चालक तथा मालक फरार झाला . त्यामध्ये माझे पतीचे हात आणि पाय दोन्ही फॅक्चर झालेवर माझे पतीचे सहकाऱ्यांनी अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे m.l.c. केस नंबर 2974/2022 नुसार उपचार कामी ऍडमिट केले.

तर, त्यावेळी डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांनी आम्हास पेशंट वर उपचारासाठी कमीत कमी आठ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले व तात्काळ पैसे जमा करा जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत मला उपचार करता येणार नाही त्यामुळे आम्ही नातेवाईकांकडून उसने पासने पैसे घेऊन अपोलो हॉस्पिटलमध्ये दि . 12 फेब्रुवारी 2022, 13 फेब्रुवारी 2022,14 फेब्रुवारी 2022 रोजी वेळोवेळी 8 लाख रुपये जमा केले तेव्हा दिनांक15 फेब्रुवारी 2022 रोजी अपोलो हॉस्पिटल सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे अपोलो हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांनी माझे पतीचे जखमी शरीरावरती ऑपरेशन करून उपचार केला. पती हनुमंत शंकर डवरे यांचेवर दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजले पासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत विविध वेगवेगळी ऑपरेशन केली पेशंट ऑपरेशन दरम्यान बेशुद्ध होते ते दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्धीवर आले. त्यावेळी डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांनी तुमच्या पेशंटला तात्काळ डिसचार्ज देण्यात येतोय तुम्ही तुमचे पेशंट घरी घेऊन जा असे सांगितले. पेशंटचे ऑपरेशन होऊन 12 तास सुद्धा झाले नव्हते पेशंट ICU मध्ये सलाईनवर असतानाच डॉक्टरने डिसचार्ज घेण्यास सांगितला तेव्हा हॉस्पिटलमध्ये आरोपीचे नातेवाईक डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसले होते त्यावेळी आम्हाला समजले की डॉक्टरने डिस्चार्ज दिल्याशिवाय आरोपीस जामीन मिळणार नाही तेव्हा डॉक्टरने आरोपीचे नातेवाईकांसोबत आर्थिक संगणमत करून आमचे पेशंटला डिस्चार्ज घेण्यास सांगितले परंतु आम्ही नकार दिला तेव्हा पेशंटवर सुरू असणारा औषध उपचार डॉक्टरांनी हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक बंद केला त्यामुळे पेशंट जास्तच गंभीर व आजारी पडले तेव्हा पेशंटवर औषध उपचार करण्यास अपोलो हॉस्पिटल प्रशासन डॉक्टर कर्मचारी यांनी नकार दिल्यामुळे आम्ही आमचे पेशंट एकायन हॉस्पिटल उलवे येथे उपचारासाठी नेले तेव्हा अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टरांनी पेशंट हनुमंत शंकर डवरे यांचेवर चुकीचा उपचार करून चुकीची शस्त्रक्रिया केलेमुळे माझे पतीस भरपूर त्रास झाल्याचे एक आयन हॉस्पिटलचे डॉक्टरांनी सांगितले . त्यावेळी माझे पती ने होणारा त्रास डॉक्टर्स ना सांगून योग्य औषधोपचाराची मागणी केली. परंतु अपोलो हॉस्पिटल बेलापूर व संबंधित ऑपरेशन करणारा स्टाफ कर्मचारी यांनी माझे पती वर चुकीचे ऑपरेशन करून माझे पती चा खून करण्याचा प्रयत्न आरोपींचे नातेवाईकांचे सांगण्यावरून केला असल्याचा शक्यता नाकारता येत नाही. माझे पतीस चुकीचे ऑपरेशन नंतर दुबार औषधोपचार करण्यास नकार दिला. या सर्व घटना पतीचा खून करण्याचे षड्यंत्र अपोलो हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टर , कर्मचारी , स्टाफ , मॅनेजमेंट स्टाप यांनी केले नंतर दुबार औषधोपचार करण्यास नकार दिल्यानंतर मी माझे पती इस एकायन हॉस्पिटल उलवे येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील एकायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे नुसार अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे ऑपरेशन स्टाफने तुमचे पतीचे चुकीचे ऑपरेशन व चुकीचे उपचारामुळे तुमचे पतीचे जीवितास धोका तथा अपंगत्व होण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही असे सांगितल्यावर मी वारंवार अपोलो हॉस्पिटल विरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु अपोलो हॉस्पिटल हे पैसे व बलाढ्य धनदांडग्यांचे हॉस्पिटल असल्यामुळे माझ्या सर्व तक्रारीस विना कारवाई दुर्लक्षित केले. 

या सर्व प्रक्रियेत माझे पतीचे जीवन व आरोग्य वाचविण्यासाठी मला पुन्हा एकायन हॉस्पिटलमध्ये नवीन उपचार घ्यावे लागले त्यामध्ये माझे लाखो रुपयाचे नुकसान तथा उपचार खर्च झाला त्यामुळे मी व माझे कुटुंबीय आज पूर्णपणे कर्जबाजारी झालो असून माझे पतीस आयुष्यभरासाठी अपंगत्वास सामोर जावे लागले. या सर्व घटनेस दोषी गाडी चालक, अपोलो हॉस्पिटल चे मॅनेजमेंट , डॉक्टर आणि गु.र.नं .55 / 2022 मधील तपास अधिकारी सर्वस्वी दोषी तर आहेतच परंतु या सर्वांनी माझे पतीचे मृत्यू संदर्भात षडयंत्र रचले व पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने माझे पतीस एकायन हॉस्पिटल मध्ये योग्य आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आजही माझे पतीचा जीव वाचला परंतु सध्या जख्मी अवस्थेत अपंगत्वास सामोरे जात आहेत. वरील सर्व घटनाक्रमास , दाखल गु.र.नं. 55/2022 मधील अपूर्ण अयोग्य त्रुटीयुक्त तपास सुरू आहे हे समजले वर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गेडेकर यांना दाखल गुन्हा तपासाचे अनुषंगाने वेळोवेळी झाला तपास, त्यातील प्रगती व पुराव्या बाबतची माहिती मागत असताना मला माहिती देणे तथा चौकशी करण्यास पोलीस उपनिरीक्षक गेडेकर यांनी नकार देऊन माहिती देण्यास टाळाटाळ तर केलीच परंतु सदरचा दाखल गुन्हा तुम्ही मिटवून घ्या समोरची व्यक्ती फार मोठी पैसेवाली असून तुमच्या कुटुंबाचा घातपात तथा खून करेल यावरून असे निदर्शनास येते की , अपघात घडविणारी व्यक्ती , अपोलो हॉस्पिटल डॉक्टर्स , कर्मचारी , आणि तपासाधिकारी यांचे फार मोठे आर्थिक संगनमत झाले असून या सर्व आर्थिक संगणकामुळे माझे पतीसह माझ्यावर अन्याय तर झालाच झाला परंतु माझे पतीस आयुष्यभरासाठी अपंगत्व स्वीकारावे लागले. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर अशी वेळ आली असताना पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ह्यांनी आरोपींसोबत आर्थिक संगनमत करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय करून केला आहे . त्यामुळे वरील सर्व घटनेची घटनेतील गंभीर गोष्टींची दाखल , गुन्ह्याची , गुन्ह्यातील अपूर्ण , आरोग्य त्रुटी , सदृश्य दोषयुक्त तपासाची आपण कसून सीआयडी तथा न्यायालयीन चौकशी करून दोषींवर लाच खाऊन केला भ्रष्टाचार , अपूर्ण अयोग्य , अधिकाराचा गैरवापर, सदोष उपचारादरम्यान पेशंटवर मानसिक दबाव व उपचारा दरम्यान दोषयुक्त उपचार झाल्यावर नवीन उपचार औषधास नकार देणे , पेशंटला मृत्यू तथा अपंग सदृश्य स्थितीत ढकलून देणे , आणि या सर्व गोष्टी नंतर आरोपींसोबत आर्थिक संगनमत करून दाखल गुन्ह्यांमध्ये दोषयुक्त त्रुटीद्वारे अन्याय अत्याचार करून माझे सह माझे कुटुंबीयावर फार मोठा अन्याय केला आहे . त्यामुळे वर नमूद सर्व संदर्भीय घटणांची आपण सीआयडी तथा न्यायालयीन चौकशी करून माझे झालेले नुकसान भरपाई सह मला तत्काळ न्याय देत दोषी घटक , दोषी तपास अधिकारी , अपोलो हॉस्पिटल , डॉक्टर व दोषी कर्मचारी अधिकारी यांचेवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करीत मला न्याय द्यावा ही नम्र विनंती त्यांच्या पत्नीने केली आहे. 

आपण जर दिनांक 5 सप्टेंबर 2022 पर्यत वरील सर्व प्रकरणाचे आपण तात्काळ कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करीत दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून माझे नुकसान भरपाई सह मला न्याय न दिल्यास दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे जाहीर आमरण उपोषण करणार असा इशारा दिला त्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे त्या वृतास माहिती देताना म्हणाल्या. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे