Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

महर्थ वृषभ गोंधळी याचा प्रथम वाढदिवस पनवेल तालुक्यातील देहरंग रा. जि. प. प्राथमिक शाळेत साजरा:

महर्थ वृषभ गोंधळी याचा प्रथम वाढदिवस पनवेल तालुक्यातील देहरंग रा. जि. प. प्राथमिक शाळेत साजरा: पनवेल (प्रतिनिधी) : कुमार महर्थ वृषभ गोंधळी याचा प्रथम वाढदिवस दिनांक 27 रोजी पनवेल तालुक्यातील देहरंग रा. जि. प. प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करत असताना, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेय जीवनात उपयोगी पडणारे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमावेळी उपस्थितांमध्ये आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे  उपाध्यक्ष भारत भोपी,  कामोठे शराध्यक्ष वृषभ गोंधळी आणि परिवार, पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, मनसे उपतालुका अध्यक्ष विश्वास पाटील, गोटीराम म्हात्रे नेरेपाडा, शुभम म्हात्रे, योगेश गावंड,अमर खोबरागडे उपस्थित होते.

क्रांतिकारी महात्मा फुले यांची पुण्यतिथी राजेश्री येवले यांच्या सानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली:

क्रांतिकारी महात्मा फुले यांची पुण्यतिथी राजेश्री येवले यांच्या सानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली: नवी मुंबई (प्रतिनिधी) : ज्योतिबा फुले महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक व दार्शनिक होते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला होता. स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी आणि समाजात त्यांना ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी 1854 मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली अशी शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती. मुलींना शिक्षण, गरीब आणि निर्बल वर्गाला न्याय देण्यासाठी ज्योतिबाने 'सत्यशोधक समाज' स्थापित केले, त्यांच्या समाज सेवेने प्रभावित होऊन 1888 मध्ये मुंबईच्या एक सभेत त्यांना 'महात्मा' या उपाधीने अलंकृत करण्यात आले. त्यांनी दलितांच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केले. त्यांनी दलित मुलांचे घरात पालन-पोषण केले. परिणामस्वरूप ते जातीतून बहिष्कृत केले गेले. ज्योतिबा फुले आणि त्यांचं संघटन सत्‍यशोधक समाजाच्या संघर्षामुळे सरकाराने एग्रीकल्‍चर एक्‍ट पास केले. महात्मा ज्‍योतिबा फुले यांनी वयाच्या 63 व्या वर्षी 28 नोव्हेंबर 1890 ला पुण्यात आपले प्राण त्यागले

APMC फ्रुट बाजारात अग्नितांडव..!!

APMC फ्रुट बाजारात अग्नितांडव..!! * दोन कामगार जखमी  * आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला लागले तबबल २ तास नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अचानक एन एन विंग मध्ये आग लागली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुठ्ठे, बॉक्स, इत्यादी जळाऊ वस्तू होत्या. त्यामुळे बघता बघता क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ४ वाजून ३६ मिनिटांनी अग्निशमन दल बाजारात दाखल झाले. वाशी आणि नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या ६ ते ७ अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचल्या. मोठ्या प्रमाणात जळाऊ खोके असल्याने आगीचे लोळ लांबपर्यंत पोचले . त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले आहेत. त्यामध्येच बघ्यांनी गर्दी केल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवून चारही बाजूने पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. मात्र तबबल दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. साधारणतः २५-३० गाळ्यांना आगीची झळ बसली आहे. मुंबई कृषी उत्पन्न फ

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा..!

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा..! मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई मधील फोर्ट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मीडिया फेस्टिवल मध्ये  सायन येथील गुरु नानक महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला असून विजेत्यांना रोख रूपये ५०,००० आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी निखिल चौरसिया, विष्णू अज्जी, हफसा खान, प्रणय खंडागळे, जॉर्डन सिंग, लावण्या खतरी, प्रेरणा खेमानी, सौरभ शर्मा, केवल दोशी, निशा उपाध्याय या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख अमरीन मोगर यांनी विद्यार्थी चे कौतुक केले व भविष्यात अशीच नवनवीन शिखरे गाठावी यासाठी शुभेच्छा दिल्या. याखेरीज महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ.पुष्पिंदर भाटिया यांनी देखील विद्यार्थ्याना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा व योग स्पर्धा अयोजित:

सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा व योग स्पर्धा अयोजित: ● सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा, योग स्पर्धा आणि पुरस्कारांचा भव्य समारंभ  संपन्न. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई वाशी येथे दिनांक 5 व 7 नोव्हेंबर रोजी मिस इंडिया, मिसेस इंडिया, परफेक्ट किड इंडिया यांसारख्या श्रेणींमध्ये फॅशन फेंझी-2 स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या फॅशन शोमध्ये देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. जामनगर गुजरातमधील नामांकित संस्था सनराइज युथ मंडळ एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवी मुंबईत झालेल्या या फॅशन शोच्या शेवटी मिस इंडिया विभागात खुशी विरेन फुरिया (महाराष्ट्र) हिची मिस इंडियासाठी निवड झाली, तर याच गटात फर्स्ट रनर अप सीमा कुमारी यादव (गुजरात) आणि सेकंड रनर अप ज्योती मेस्तेकर (महाराष्ट्र) हिची निवड झाली. मिसेस इंडियाचे विजेते पद रिटा आरोलकर (महाराष्ट्र) यांनी पटकावले तर रंजिता फुरिया (महाराष्ट्र)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत...!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत...!! मुंबई (प्रतिनिधी) :-   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे.,विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार असून दौऱ्याची तारीख ठरली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. गुवाहटीला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतरणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली त्याच प्रकारची ही खास पूजा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय हा दौरा आहे. गुवाहटीच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आम

श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा थाटामाटात संपन्न:

श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा थाटामाटात संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी):- श्री धनलक्ष्मी महिला मंडळ, वाशी आयोजित व आर के ग्रुप प्रस्तुत व विनस वुमनस हॉस्पीटल कामोठे मलबार गोल्ड व उषा दत्त दिदी सहप्रस्तुत श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे मोठया उत्हासात संपन्न झाला या कार्यक्रमात आंतरशालेय शिक्षक समुह नृत्य स्पर्धा तसेचा महिला समुह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या तसेच धनलक्ष्मी महिला बर्थडे क्लब अंतर्गत एकूण ५ महिलांचा डॉ स्नेहा देशपांडे / विदया ठाकूर, ऑड़े मोरेस, मधुरा चव्हाण, गरीशा वाघ या ५ महिलांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले.  तसेच यावेली महिलांची भव्य उपस्थितीत व अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले. सदर कार्यक्रमात संपन्न झालेल्या आंतरशालेय शिक्षक व महिला समुह नृत्य स्पर्धेमध्ये सर्व ग्रुपने बहारदार नृत्यांचे सादरीकरण केले. यामध्ये लोकनृत्ये, सामाजिक विषय तसेच विविध प्रकारचे नृत्य अविष्कार सादर करण्यात आले. तसचे उपस्थित सर्व महिला वर्गांनी मंगळागौर वर नृत्य सा