महर्थ वृषभ गोंधळी याचा प्रथम वाढदिवस पनवेल तालुक्यातील देहरंग रा. जि. प. प्राथमिक शाळेत साजरा:
पनवेल (प्रतिनिधी) :
कुमार महर्थ वृषभ गोंधळी याचा प्रथम वाढदिवस दिनांक 27 रोजी पनवेल तालुक्यातील देहरंग रा. जि. प. प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करत असताना, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेय जीवनात उपयोगी पडणारे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी उपस्थितांमध्ये आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष भारत भोपी, कामोठे शराध्यक्ष वृषभ गोंधळी आणि परिवार, पनवेल तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, मनसे उपतालुका अध्यक्ष विश्वास पाटील, गोटीराम म्हात्रे नेरेपाडा, शुभम म्हात्रे, योगेश गावंड,अमर खोबरागडे उपस्थित होते.