Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी यांची जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..!

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी  यांची  जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :-   शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखाचा पदभार स्वीकारुन श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे, दि. १५ डिसेंबर पासून त्यांनी जिल्ह्यातील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन विविध विषयावर चर्चा केली, तर काही सामाजिक प्रकल्पांना भेटी देऊन विस्तृत माहिती जाणून घेतली.  शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी श्रमिकाताई दळवी यांच्यावर नुकतीच सोपवली आहे. त्याचा फायदा तळागाळातील जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे श्रमिकाताईंनी सांगितले आहे. संपर्कप्रमुख श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात दाखल होऊन देवगड, मालवण, वैभववाडी, कणकवली या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, शिवाय शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयांना भेट दिली, त्यावेळी

विनस मिस युनिव्हर्स 2022 हा किताब जिंकला मुंबईतील अरुंधती यांनी..!!

विनस मिस युनिव्हर्स 2022 हा किताब जिंकला मुंबईतील अरुंधती यांनी..!!  विनस मिस युनिव्हर्स 2022 हा किताब जिंकला मुंबईतील अरुंधती आणि विनस मिसेस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला शैलजा यांनी नवी मुंबई (प्रतिनिधी) : जयपूरमधील अजमेर रोड येथील एका रिसॉर्टमध्ये विनस मिस आणि मिसेस युनिव्हर्स 2022 या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मिस कॅटेगरीमध्ये देशभरातील टॉप 14 मॉडेल्सनी भाग घेतला होता आणि मिसेस कॅटेगरीतील टॉप 18 मॉडेल्सनी त्यांच्या कामगिरीने परीक्षकांना प्रभावित केले. यासोबतच आपल्या कामाने इतर महिलांवर प्रभाव टाकणाऱ्या 21 महिलांना विनस प्रेरणा महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विनस फिल्म अँड इव्हेंट्स कंपनीचे संचालक जे.जे. कश्यप यांनी सांगितले की, कंपनीतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम गेल्या 20 वर्षांपासून आयोजित केले जात आहेत, कंपनीतर्फे 27 मार्च रोजी गोव्यात विनस मिस इंडिया 2022 चे आयोजन करण्यात आले होते आणि विनस मिसेस इंडिया 2022 हा कार्यक्रम 18 जून रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात आले होता, या भागामध्ये विनस कंपनीने मिस आणि मिसेस युनिव्हर्स 2022 चे

महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन:

महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन: महाड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या शीर्षकाखाली महाड चवदार येथे एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन करण्यात आले. 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करण्यात यावे यासाठी येथे पाण्याचा सत्याग्रह करून हा तलाव तमाम अस्पृश्य जनतेसाठी खुला करून दिला. तसेच, प्रसंगी अनेक संकटांचा सामना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायान समवेत हा लढा देऊन हा सत्याग्रह केला होता. याच इतिहासाची पुन्हा एकदा सर्वांना आठवण  करून देण्यात यावी व डॉ बाबासाहेबांच्या या सर्वांगीण कार्याचा जनमानसात प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा जनहिता चा उपक्रम राबवला आणि याच्या जोडीने महाडला जाताना जी ऐतिहासिक गांधारपाले बौद्ध लेणी सुद्धा आहे या लेणीची सुद्धा नागर

नेरूळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली:

नेरूळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली: नवी मुंबई ( नेरुळ/प्रतिनिधी ) : - ६ डिसेंबर २०२२  रोजी महामानव परमपूज्य  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली चे अयोजन करण्यात आले होते. नेरूळ विभागातील सर्व धम्म बांधव व धम्म भगिनी नेरूळ (पू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये समता बौध्द मित्र मंडळाचे अध्यक्ष आयू. वसंत सोरे यांच्या अध्यक्षतेखाली धम्म वंदना धेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच या वेळी, समता बौद्ध मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आयु. सूदत्त खरात सचिव आयु. प्रदीप माने तसेच समता बौद्ध मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आयु. राहुल जावळे, आयु. उत्तमराव फणसे, आयु. गाडे , आयु. जाधव , आयु एल आर गायकवाड नमुंमपा शालेय मुख्याध्यापक शिक्षक मधुकर गायकवाड त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे  समाजसेवक आयु तेजस फणसे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रति