Skip to main content

Rakhi Sawant - अभिनेत्री राखी सावंतची आईचे निधन:

Rakhi Sawant - अभिनेत्री राखी सावंतची आईचे निधन:

अभिनेत्री राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर शनिवारी २८ जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले.

मुंबई (प्रतिनिधी) :  

अभिनेत्री राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण आज अखेर  शनिवारी २८ जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतला. राखीने याविषयीची माहिती दिली आहे. अखेरच्या क्षणांमध्ये राखी आईसोबतच होती. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगितले होते. तसेच जया यांची प्रकृती गंभीर असल्याचंही ती म्हणाली होती.

जया सावंत यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिग बॉस मराठी ४ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात तिने आई आयसीयूमध्ये  असल्याचं सांगितलं होतं. राखीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना चाहत्यांना तिच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. तिने लिहिले होते की, 'आई रुग्णालयात आहे. तिची तब्येत बरी नाही तिच्यासाठी प्रार्थना करा.' पण आज अखेर तिच्या आईने जगाचा निरोप घेतला आहे.

राखी सावंतच्या आईला ब्रेन ट्युमर होता. तिची आई काही वर्षांपासून आजारी होती. राखी 'बिग बॉस मराठी सीझन ४' मधून बाहेर पडताच तिला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याचंही राखी सावंतने म्हटलं होतं. नुकतेच मुंबईत आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते. महिला मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीची चौकशी केली. दिवसभर चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून राखीची आई जया भेडा रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक होती. अशा परिस्थितीत राखी आईसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होती. नुकतीच तिने आई बरी व्हावी म्हणून कौतुकास्पद पाऊल उचललं होतं. राखीने आईसाठी एनजीओमधल्या मुलांना चिप्स, कुरकुरे आणि लेसचे पॅकेट वाटले होते.

एवढंच नाही तर तिने ५०० रुपयांच्या नोटा देखील वाटल्या होत्या. आणि आईसाठी प्रार्थना करायला सांगितले होते. "प्रार्थना आणि औषधामुळेच माणसाला वाचवता येते.' असं म्हणत राखी रडली देखील होती. आता एकीकडे राखीच्या सुखी जीवनाची सुरुवात झाली असली तरी आईने मात्र तिची साथ सोडली आहे. राखीच्या कुटुंबातून तिला आईची साथ होती, पण तिच्या निधनाने आता राखी एकटी पडली आहे. राखीच्या आईच्या निधनावर चाहते शोक व्यक्त करत आहेत.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे