Skip to main content

राजेश्री येवले यांच्या सानपाडा विभागातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या धूम धडाक्यात संपन्न:

राजेश्री येवले यांच्या सानपाडा विभागातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या धूम धडाक्यात संपन्न:

सानपाडा (प्रतिनिधी):- नवी मुंबई सानपाडा सानपाडा सेक्टर ८ विभागाच्या महिला कामगार संघटना व धीरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा तसेच शिवसेनेच्या समाजसेविका राजेश्री येवले यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे   उद्घाटन माथाडी कामगार नेते ॠषीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा रविवारी १० जून २०२३ रोजी मोठ्या धूम धडाक्यात संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनासाठी आशमिक कामठे आयोजित कमल आनंद कलामंच प्रस्तुत, "वारसा माझ्या महाराष्ट्राचा" या लोकनृत्याचा नृत्यविष्कार राजेश्री येवले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. लावणी सम्राट आशमिक कामठे यांनी बहारदार लावणी सादर केली. यावेळी सानपाड्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद घेतला. 

सानपाड्यातील शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय हे १२ ही महिने २४ तास सानपाड्यातील रहिवाशांसाठी कार्यतत्पर राहणार आहे. राजेश्री येवले या शिवसेना शाखेच्या माध्यमातून महिलांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करून नक्कीच त्यांना सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन या माध्यमातून करतील व स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखिल मिळेल, शिवसैनिक तसेच सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी राजेश्री येवले यांनी  व्यक्त केले

ॠषीकांत शिंदे (माथाडी कामगार नेते शिवसेना) -

राजेश्री ताई यांचे कार्य गेल्या कित्येक वर्ष जवळ जवळ पहात आहे कित्येक वर्षांपूर्वीपासून सामाजिक प्रश्न नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा जो ओढा आहे किंवा त्याकरता त्यांनी जे घेतलेली भूमिका आहे ती निश्चित वाकवण्याजोगे आहे. त्यांच्या पुढील कार्यामध्ये म्हणजे आता या शिवसेनेच्या मार्फत ज्यावेळेला काम करताना त्यांच्या असलेल्या पुढील कार्यात माझ्या आणि आमच्या तमाम सहकार्याच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.

यापसंगी प्रमुख उपस्तीथी अशोकराव गावडे मा. उपमहापौर नवी मुंबई, सरोजताई पाटील महिला जिल्हा प्रमुख, दमयंती आचरे ताई संपर्क प्रमुख नवी मुंबई, अजित सांवत उपजिल्हा प्रमुख सानपाडा विभाग, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते, महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे