Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन:

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन: नवी मुंबई (रुपाली वाघमारे): रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी "उत्सव आपला, सत्कार आपल्या पाल्यांचा " या संकल्पनेतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन इत्यादी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर, सेक्टर ८ ऐरोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४.४५ वाजता दीपप्रज्वलन आणि मराठी भावगीतांचा संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता आय कार्ड योजनेचा शुभारंभ आणि सर्व सभासद आणि कुटूंबा सह आई तुळजाभवानीची आरती घेण्यात आली. तसेच या सोहळ्यात संघाच्या शाळांमधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, महिलांना पाककला आणि संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांनाही  पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी कामगार कल्याण आयुक्त महाराज्य मा. रविराज इळवे हे असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे अ

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त नवी मुंबईत 'वॉकथॉन'

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त नवी मुंबईत 'वॉकथॉन' नवी मुंबई (प्रतिनिधी):- अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे-२०२३’ निमित्त नवी मुंबईत मजेदार वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. वॉकथॉनने डॉक्टरांबद्दल त्यांच्या आरोग्यदायी समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य जीवनशैलीतील आजारांपासून बचाव करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरुकता वाढवण्याची संधीही याने दिली. सर्व डॉक्टरांचे सध्याच्या अनिश्चित काळात निस्वार्थी वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि लवचिकतेबद्दल आणि जीवनशैलीच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या वाळकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते यात नवी मुंबई अपोलो हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, परिचारिका, नागरीकानी उस्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळेस 'डॉक्टरांसाठी चाला! आरोग्यासाठी चाला!’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वच जण नवी मुबंईत डॉक्टरांचे आभार व्यक्त करण्यासाठी वॉकथॉन मध्ये सहभागी झाले.     श्री संतोष मराठे, प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी-पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,