Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

पाणीपुरवठा बाबतीत प्रितम म्हात्रे आक्रमक.. "पायोनियर मधील जलकुंभाची केली पाहणी"

पाणीपुरवठा बाबतीत प्रितम म्हात्रे आक्रमक.. "पायोनियर मधील जलकुंभाची केली पाहणी" पनवेल (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): उन्हाळ्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई होती. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीसुद्धा पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे काही परिसरात नागरिकांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही जागृत लोकप्रतिनिधी कार्यकाळ संपला असताना सुद्धा विविध नागरी समस्यांचा सतत पाठपुरावा घेत असतात. याचाच प्रत्यय आज पनवेल मधील पायोनियर मधील नागरिकांना आला. पायोनियर विभाग येथे नवीन जलकुंभाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी अद्याप जोडणीचे काम झाले नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे करत होते.आज अखेरीस त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन या टाकीची पाहणी केली असता त्यांना तेथे अनेक त्रुटी आढळल्या. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला केबिन नाही,तसेच पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण झाले नाही. कारण की नव्याने केलेल्या रस्त्यात सिमेंट काँक्रीटकरण झाल्यामुळे तेथे ब्रेकिंग करून पुन्हा तिथे काम करावे लाग