Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनेव्दारे ‘अँनिमिया की बात, कम्युनिटी के साथ’ मोहिमेव्दारे उपक्रमाचा शुभारंभ:

जागतिक अँनिमिया दिनानिमित्त १३ फेब्रुवारी २०२४,  ॲनिमिया मुक्त भारत मोहिमेस पाठींबा दर्शवत देश   अँनिमिया मुक्त करण्यासाठी आएपीचा पुढाकार.. इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनेव्दारे ‘अँनिमिया की बात, कम्युनिटी के साथ’ मोहिमेव्दारे उपक्रमाचा शुभारंभ: नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे):   देशभरातील क्लिनिक आणि हॉस्पिटलमधील ४४,००० बालरोगतज्ञ  जन्मलेल्या बाळापासून ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांची तपासणी करणार - “आयएपी की बात, कम्युनिटी के साथ" या अनोख्या उपक्रमांतर्गत बाल आरोग्य जनजागृती मोहिम मुंबई: इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) ने बाल आरोग्यासंबंधीत समस्या दूर करण्यासाठी तसेच व्यापक जनजागृतीसाठी "आयएपी की बात, कम्युनिटी के साथ" नावाचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये "ॲनिमिया की बात, कम्युनिटी के साथ" हा पहिला मुख्य विषय असून त्यानंतर लठ्ठपणा, ऑटिझम, डाउन सिंड्रोम आणि थॅलेसेमिया यासारखे इतर महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. अचूक माहिती मिळविणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, ज्याचा मुलांचे आरोग्य जोपण्यात चांगला परिणाम होऊ शकतो आणि एकूणच सामाजिक आरोग्यासाठी