Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

होळीच्या आधी आणि नंतर केसांची काळजी घेणे हे रंग आणि रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे

होळीच्या आधी आणि नंतर केसांची काळजी घेणे हे रंग आणि रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे लेखक: जिगर रावरिया सह-संस्थापक, ब्यूटी गॅरेज प्रोफेशनल होळीचा सण  रंगांसाठी आणि अनेक मौजमजेसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, सणांसोबत केसांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीपूर्वी केसांची निगा राखण्यासाठी येथे काही टिप्स आहेत: • तुमच्या केसांना तेल लावा: खोबरेल तेल, बदाम तेल किंवा शिया तेल तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. हे एक संरक्षणात्मक अडथळा निर्माण करते, ज्यामुळे रंगांना केसांच्या मुळांमध्ये प्रवेश करणे कठीण होते. • तुमचे केस झाकून ठेवा: होळी खेळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी केस झाकण्यासाठी टोपी किंवा स्कार्फ घाला. हे रंगांशी थेट संपर्क कमी करेल आणि ते तुमच्या केसांना चिकटण्यापासून प्रतिबंधित करेल. • तुमचे केस बांधा: रंगांचा संपर्क कमी करण्यासाठी तुमचे केस अंबाडा किंवा वेणीत बांधा. हे खेळताना केस तुटण्यास प्रतिबंधित करते. • लीव्ह-इन कंडिशनर लावा: होळी खेळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी, ग्लास शाइन स्प्रे किंवा बोटोलिस हेअर सीरमसारखे बोटोलिस ग

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन

कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन: "शिवसेनेचा जन्मच हा न्याय हक्काच्या लढ्यासाठी झाला "- मा  उद्धव ठाकरे पनवेल (प्रतिनिधी): शिवसेनेचा जन्मच मुळी न्याय हक्काच्या लढाईसाठी झाला आहे. हा लढा लढत असताना अनेेक वेळा शिवसैैनिकांवर केसेस होतात. परंतु आता आपल्याला त्याची भिती नाही, कारण कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयातून शेकडो तरुण आता दरवर्षी वकील म्हणून बाहेर पडतील व ते शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील, असा विश्‍वास आज तळोजा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेली 27 वर्ष बबन पाटील हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना मोफत गणवेश, वह्या पुस्तके, पोषण आहार दिला जात आहे. हे काम त्यांचे कौतुकास्पद आहे. सध्या देशात काय चाललयं, राज्यात काय चाललयं याची कल्पना सर्वांना आहे. न्याय मिळण्यासाठी वर्षोनुवर्षे वाट बघावी लागत आहे. इंग्रज काळात सुरू असलेले कायदे आजही

नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या तेराव्या पर्वासाठी चौदा सौंदर्यवती सज्ज:

नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या तेराव्या पर्वासाठी चौदा सौंदर्यवती सज्ज: ८ मार्च २०२४ रोजी आंतराष्ट्रीय महिला दिनी होणार मिस नवी मुंबई सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे): सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी जी मानली जाते ती अर्थातच मिस नवी मुंबई आपल्या तेराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट ने तेरा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्य स्पर्धा आपल्या नवी मुंबई मध्ये आयोजित करावी. अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.   "आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिम च्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाते." यू अँड आय एंटरटेनमेंट चे

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे

आचार्य मनीष यांच्याद्वारे HIIMS येथे डॉ. बीआरसी यांच्या 'हेल्प' पुस्तकाचे प्रकाशन:

आचार्य मनीष यांच्याद्वारे HIIMS येथे डॉ. बीआरसी यांच्या 'हेल्प' पुस्तकाचे प्रकाशन: नवी मुंबईतील हिम्स (HIIMS) मध्ये मूत्रपिंड व यकृत निकामी कर्करोग आणि हृदयाच्या समस्यांवर आयुर्वेद तसेच नैसर्गिक उपचार पध्दतींद्वारे होणार यशस्वी उपचार उपलब्घ: आचार्य मनीष नवी मुंबई (प्रतिनिधी): किडनी, यकृत निकामी होणे, त्याप्रमाणे कर्करोग आणि हृदयाच्या समस्यावर आयुर्वेद आणि नैसर्गिक पध्दतींनी यशस्वी उपचार शक्य असल्याचे प्रतिपादन येथील आचार्य मनीष आणि डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी (बीआरसी) यांनी HIIMS नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी डॉ. बीआरसी यांच्या नवीन ‘लेट युअर सेकंड हार्ट हेल्प’ द्वारे ‘टेलरिंग इज द हेल्दी प्रोफेशन’ या महत्त्वपूर्ण अभ्यासाचे प्रकाशन केले आहे. या अभ्यासात एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले आहे की टेलर ही अशी व्यक्ती की जिते ज्याचे कामच मुळात बैठे असून देखील आपल्यातील सर्वात निरोगी गट म्हणून तो ओळखला जातो. एक निरोगी व्यवसाय म्हणून टेलरिंगचे महत्त्व अधोरेखित करून, व्यवसाय आणि आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपुर्ण ठरत आहे. ड