Skip to main content

नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या तेराव्या पर्वासाठी चौदा सौंदर्यवती सज्ज:

नामांकित सौंदर्य स्पर्धा मिस नवी मुंबईच्या तेराव्या पर्वासाठी चौदा सौंदर्यवती सज्ज:

८ मार्च २०२४ रोजी आंतराष्ट्रीय महिला दिनी होणार मिस नवी मुंबई सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी

नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे): सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी जी मानली जाते ती अर्थातच मिस नवी मुंबई आपल्या तेराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट ने तेरा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्य स्पर्धा आपल्या नवी मुंबई मध्ये आयोजित करावी. अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.  

"आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिम च्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाते."

यू अँड आय एंटरटेनमेंट चे हरमीत सिंग यांनी सांगितले.

"तरुण मुलींमधील गुणविषेश ओळखून ते तेवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना रंगमंचावर आणण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेत आहोत. आणि या प्रतिभावान मुलींना योग्य असे व्यासपीठ देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ''

 यू अँड आय एन्टरटेनमेंट चे डायरेक्टर मनमीत सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

"नवी मुंबईत सौंदर्यवती होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी अशी कोणतीही संधी उपलब्ध नसताना आम्ही त्यांना व्यासपीठ देण्यास सुरुवात केली. नवी मुंबई च रूपांतर एका ग्लॅमर शहरात करण्याच्या उद्देशाने आम्ही सौंदर्यववतींच्या कलागुणांना वर्षानुवर्षे अशी अप्रतिम संधी देऊ शकलो आणि देत राहू  याचा आम्हाला आनंद आहे!" 

श्री सुरिंदर सिंग - यू अँड आय एंटरटेनमेंट चे अध्यक्ष यांनी नमूद केले.

व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक आणि मानसशास्त्रज्ञ इंदरप्रीत कौर या सांगतात कि  "मी वैयक्तिकरित्या या सौंदर्यवतीं मध्ये वर्षानुवर्षे झालेले परिवर्तन पाहिले आहे आणि एकत्रितरित्या हि स्पर्धा आयोजित केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो"

"मिस नवी मुंबई आणि यू अँड आय सोबत आमचा बरेच वर्ष संबंध आहे.  या स्पर्धेने शहराला जो नाव लौकिक मिळून दिला आहे,  त्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध झालो आहोत आणि या प्रतिष्ठित स्पर्धेशी आम्ही संबंधित आहोत याचा आनंद वाटतो." असे  फोर पॉईंट नवी मुंबई चे महाव्यवस्थापक, स्टीफन डिसूझा यांनी सांगितले.

"गेल्या अनेक वर्षांपासून मिस नवी मुंबई सोबत माझं एक नातं निर्माण झालं आहे. या स्पर्धेमध्ये मिळणार आनंद व नवनवीन गोष्टीचे ज्ञान हे प्रत्येक वेळी काही तरी नवीन शिकवून जाते. " असे रनवे डायरेक्टर आणि रॅम्प वॉक ट्रेनर स्मृती बथिजा हिने सांगितले. स्मृती ने मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९-२०२० 'किताब जिंकला आहे.

मिस नवी मुंबई २०२४ ची पत्रकार परिषद फोर पॉइंट्स वाशी येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन अभिनेत्री सिमरन आहूजा हिने केले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सौंदर्यवतींनी उपस्थितांची मने जिंकलीत यावेळी फोर पॉईंट नवी मुंबई चे किरण मुनीराज,अभिजित अदूरकर, रिया मेक्कट्टुकुलम, मिस महाराष्ट्र गौरी गोठणकर ,डॉ संजीव कुमार,अशोक मेहरा,सौम्या सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. 

अंतिम फेरी मध्ये दाखल झालेल्या सौंदर्यवतीं श्रद्धा चौधरी,गीताश्री डेका, हर्षिखा रावत, भावना अजवानी, स्नेहा धाकटे, श्रिया नंदिनी,सपना देवडा, सुकन्या कंदारकर, कनक अग्निहोत्री, कुमुद कुमार, अनुष्का सिंह, मयुरी मिश्रा,हिमांशी छल्लानी,तमन्ना भरत किताब जिंकण्यासाठी सज्ज आहे.

रॅम्प वॉकचे प्रशिक्षण अभिनेत्री आणि मॉडेल सिमृती बथिजा- रनवे कोरिओग्राफी आणि पेजेंट ग्रूमिंग एक्सपर्ट- मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९ द्वारे केले जाईल.तसेच  व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आणि मेंटल वेलनेस मेंटॉरिंग हे मानसशास्त्रज्ञ आणि व्यक्तिमत्व विकास मेंटॉर - इंदरप्रीत कौर गुप्ता यांच्याद्वारे दिले जातील.  जेणे करून त्यांच्यातील व्यक्तीमत्वाला चालना मिळेल व अंतिम फेरीत स्वतःला त्या सिद्ध करतील. या स्पर्धेची अंतिम फेरी आंतराष्ट्रीय महिला दिनी  शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी वाशीच्या फॉर फोईन्ट्स मध्ये संपन्न होईल.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे